आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेतून अल्पवयीन मुलीचे अपहरण; नाकात सोन्याची फुली, गळ्यात सोन्याचे ताईत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जडीबुटीचा व्यवसाय करण्यासाठी शहरात आलेल्या कुटुंबातील १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात ९ एप्रिल रोजी देण्यात आली. मुलीच्या वडिलांनी ही फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा एप्रिल रोजी चितोडिया कुटुंबीय जडीबुटी विकण्यासाठी बाजारात गेले होते. तेव्हा त्यांची १७ वर्षांची मुलगी सोनू पप्पुसिंग चितोडिया, तीन मुले आणि दोन मुली घरीच होत्या. मात्र जेव्हा पप्पुसिंग दुपारी चारच्या सुमारास घरी परतले तेव्हा सोनू घरी दिसून आली नाही. तिचा सर्वत्र शोध घेतला असता ती कुठेही सापडली नाही. म्हणून तिच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार दिली. 


रंग गोरा, सडपातळ बांधा, लाल रंगाचा पंजाबी ड्रेस, नाकात सोन्याची फुली, गळ्यात सोन्याचे ताईत, मारवाडी व हिंदी भाषा असे तिचे वर्णन असून तिला फूस लावून पळवण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत काहीही माहिती असल्यास एमआयडीसी सिडको पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलिस उपनिरीक्षक के. एस. निर्मळ तपास करीत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...