आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षाने संधी दिल्यास खा. खैरैंना चीत करेन : आमदार सतीश चव्हाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जेथे काँग्रेसचा सलग तीन-चार वेळा पराभव झाला ते मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला दिले जाण्याची शक्यता आहे. तसे झाले अन् पक्षाने संधी दिली तर मी येथून खासदार चंद्रकांत खैरे यांना चीत करू शकतो, असा दावा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला. हिवाळी अधिवेशनात मराठवाड्यातील कोणते प्रश्न त्यांनी उपस्थित केले, याची माहिती देण्यासाठी पत्रपरिषद बोलावली होती. त्यात त्यांनी मूळ प्रश्न बाजूला ठेवत खासदार खैरे यांच्यावर तोफ डागली. शहागंज येथील घटनेनंतर खासदार खैरे मी हिंदूंचा रक्षक आहे, असे भाष्य करताहेत. त्यामुळे ही दंगल त्यांनीच घडवली असावी, असा संशय येत असल्याचे चव्हाण म्हणाले. कुलगुरूंची स्वतंत्र चौकशी व्हावी, तोपर्यंत त्यांना रजेवर पाठवावे, कुलगुरूंनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. 


खैरेंपेक्षा दानवे उजवे
खा.खैरे यांनी एकही मोठा प्रकल्प शहरात किंवा जिल्ह्यात आणला नाही, त्यांच्यापेक्षा जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे हे उजवे अाहेत, त्यांनी ड्रायपोर्टसह दोन मोठे प्रकल्प जालन्यात आणले, अशा शब्दांत दानवे यांचे कौतुक केले. दानवेंच्या कौतुकानंतर उपस्थित झालेल्या प्रश्नाच्या उत्तरात 'मी अजिबात भाजपमध्ये जाणार नाही' असा खुलासाही त्यांनी केला.