आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत राज ठाकरेंची पत्रकार परिषद, म्हणाले, ज्यांच्या हाती सत्ता दिली त्यांनी वाट लावली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. या यानिमित्ताने त्यांनी गुरुवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. आपल्या मराठवाडा दौऱ्यात सरकारने मराठवाड्याला काय दिले याचा आढावा घेणार आहेत. सोबतच, आपण ज्यांच्या हाती सत्ता दिली त्यांनी वाट लावली अशी टीका राज यांनी केली आहे.

 

या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी औरंगाबादच्या कचरा प्रश्नासह मनपा निवडणूक आणि ईव्हीएमचा मुद्दा देखील छेडला. भारतीय जनता पक्ष देश आणि स्थानिक पातळीवर मनपा निवडणुकींमध्ये सुद्धा ईव्हीएमच्या बळावर निवडणुका जिंकत आहे असे आरोप त्यांनी लावले. सोबतच, औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर बोलताना त्यांनी औरंगाबादच्या मनपाला नाशिक मनपा कचरा व्यवस्थापनाचा आदर्श घ्यावा असे म्हटले आहे. 

 

नरेंद्र मोदींचे कौतुक करणारा पहिला मीच होतो, पण ते फिरले
पंतप्रधानांवर प्रश्न विचारला असता देशात पंतप्रधान कोण व्हावे किंवा त्या पदासाठी कोणते ऑप्शन हवे हे कधीच जनतेला विचारात घेऊ झालेले नाही. 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे समर्थन करणारा पहिला मीच होतो. त्यांच्यासारखा पंतप्रधान या देशाला लाभावा असे मी म्हणालो होतो. परंतु, सत्तेवर आल्यानंतर मोदी फिरले आणि भाजपने देशाचे वाटोळे केले असे राज ठाकरेंनी म्हटले आहे. सोबतच, 2019 मध्ये भाजप आणि शिवसेना युतीची सत्ता येणारन नाही. मी त्यासाठी प्लॅनिंग केली आहे असा दावा राज ठाकरेंनी केला.

 

30 वर्षांत शिवसेने औरंगाबादेत केले काय?

औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर सवाल केला असता राज ठाकरेंनी नाशिकचे उदाहरण दिले. नाशिकमध्ये कचरा व्यवस्थापन कसे केले जाते ते पाहा. तेथे कुठून कचरा उचलला आणि कुठून नाही याचे जीपीएस द्वारे निरीक्षणही केले जाते. आम्ही फक्त 5 वर्षांत इतके व्यवस्थापन केले. ते औरंगाबादच्या महानगर पालिकेवर 30 वर्षांपासून सत्तेवर असलेल्या शिवसेनेला कसे जमले नाही. त्यांनी या प्रश्नावर केले तरी काय असा जाब राज ठाकरेंनी विचारला आहे. 

 

पत्रकारांनाच झापले...

राज ठाकरेंनी औरंगाबाद मनपातील सत्ताधारी पक्ष शिवसेना आणि शहराचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर शरसंधान करताना पत्रकारांनाही झापले. कचरा, लोकांचे प्रश्न औरंगाबादचे प्रश्न आणि एकूणच औरंगाबादच्या समस्यांवर मला नको तर येथील मनपातील सत्ताधारी शिवसेना, राज्यातील सरकार आणि स्थानिक खासदार चंद्रकांत खैरे यांना प्रश्न विचारा असे राज ठाकरे म्हणाले. एवढेच नव्हे, तर खोचक प्रश्न विचारत असताना मी आपल्याला राज्याची ब्लू प्रिंट दिली होती. वारंवार त्यावर केवळ प्रश्न विचारले. परंतु, त्या ब्लू प्रिंटचा अभ्यास तरी केला आहे का असा सवाल त्यांनी पत्रकारांना विचारला आहे.

 

आपल्या भांडणात परप्रांतियांचा फायदा
राज ठाकरे म्हणाले, राज्यात आपण एकमेकांमध्ये भांडत बसलो आणि त्यामध्ये परप्रांतियांचा फायदा होत आहे. त्यांनी यात मुंबईच्या झोपडपट्ट्य़ांचे उदाहरण दिले. मुंबईत एका-एका झोपडपट्टीच्या बदल्यात एक-एक कोटी रुपये मोजले जात आहे. तेच झोपडपट्टी मालक पैसा घेऊन पुन्हा दुसऱ्या झोपडपट्टीत राहतात. सोबतच, राज्यात इतक्या नोकऱ्या निघतात परंतु, त्यामध्ये राज्यातील युवकांना संधी दिली जात नाही. त्या नोकऱ्यांवर सुद्धा परप्रांतियांकडून डल्ला मारला जात आहे. 

बातम्या आणखी आहेत...