आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पित्यानेच केला 14 वर्षाच्या मुलीचा विनयभंग, अश्लील इशारे करून केले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आैरंगाबाद- फुलेनगरात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या पित्यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. 


सिडको परिसरातील फुलेनगरात राहणारी ३४ वर्षीय व्यक्ती बांधकाम करते. मिस्त्री म्हणून काम करणाऱ्या पित्याने २१ मे २०१६ रोजी आपल्याच १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात धरून तिच्याशी वाईट हावभाव केले. अश्लील इशारे करून उजवा हात पकडून ओढण्याचा प्रयत्न केला. मुलीने हाताला जोरात झटका देऊन आपली सुटका करून घरातून पळून गेली. भांडीकाम करण्यासाठी गेलेल्या आईकडे तिने धाव घेतली. पोलिस उपनिरीक्षक सागर कोते यांनी तपास करून पोटच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्यास अटक केली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. 


या खटल्याची अंतिम सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांच्यासमोर झाली असता सहायक लोकअभियोक्ता ज्ञानेश्वरी नागुला यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदवले असता अल्पवयीन मुलीची आणि तिच्या अात्याची साक्ष महत्त्वाची ठरली. 

बातम्या आणखी आहेत...