आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दिवस ठणठणाट, आज मिळतील एटीएमवर पैसे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-शनिवार आणि रविवार दोन दिवस सुट्या आल्यामुळे शहरातील बहुतांश एटीएमवरील पैसे संपले. उस्मानपुरा, रेल्वेस्टेशन परिसर, उल्कानगरी, सिडको, औरंगपुरा, टीव्ही सेंटर या भागातील सर्वच एटीएम बंद होते. पैसे काढण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागली. दरम्यान, मंगळवारपासून सर्व एटीएम सुरळीत होतील, अशी माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

 
दोन किंवा त्यापेक्षा जास्त सुट्या लागून आल्यास शहरातील एटीएम ड्राय होण्याचे प्रकार वाढत आहेत. शनिवार व रविवारी एसबीआय, बँक ऑफ महाराष्ट्र, एचडीएफसी, आयडीबीआय आदी बँकांतील एटीएममध्ये खडखडाट होता. सोमवारी तर बहुतांश एटीएममधील पैसे संपले होते. सुट्यांचा हा परिणाम असून काही प्रमाणात कॅशचीही कमतरता असल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले. सोमवारी बँका सुरू झाल्यानंतर एटीएममध्ये पैसे भरणे सुरू झाले. मंगळवारपासून सर्व एटीएममध्ये पुरेसे पैसे असतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...