आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सून गोव्यात; 11 जूनपर्यंत महाराष्ट्रभर; 8 ते 10 जूनपर्यंत अनेक ठिकाणी मुसळधार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मान्सून गुरुवारी गोव्यात दाखल झाला. शुक्रवारी तो तळकोकणात दाखल होऊन ११ जूनपर्यंत महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, ८ ते १० जून या काळात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे.   
गुरुवारी मान्सूनने मध्य अरबी समुद्र, तटीय कर्नाटक, द. कर्नाटकाचा अंतर्गत भाग व गोव्यापर्यंत मजल मारली. शुक्रवारपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल. ११ जूनपर्यंत तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे. 

 

राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा   

८ जून  : कोकण-गोव्यात काही  ठिकाणी जोरदार, तुरळक ठिकाणी अतिवृष्टी. मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता.   

 

९ व १० जून : कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार.

बातम्या आणखी आहेत...