आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादच्‍या नामांतरासाठी शिवसेनेचे मंत्री काहीही बोलत नसल्‍याचा खा. खैरेंचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शिवसेनेने औरंगाबादेत प्रवेश केल्यापासून शहराचे नामांतर ‘संभाजीनगर’ करणे हा कळीचा मुद्दा राहिला आहे. ३० वर्षे याच जुन्या मुद्द्यावरून शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेंनी स्वकीयांवरच बाण सोडला. मंत्रिमंडळात सेनेचे १२ मंत्री असून एकही मंत्री संभाजीनगरबाबत बोलत नाही. मुख्यमंत्री ऐकत नसतील तर शिवसेना स्टाइलने त्यांना बघून घ्यावे. पण यातील काहीच होत नाही. त्यामुळे मी संतप्त आहे, मी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचे तेे म्हणाले. खैरे म्हणाले, ‘मी मुख्यमंत्र्यांसह सेनेच्या सर्व मंत्र्यांना पत्र दिले. 

 

मुख्यमंत्र्यांना भेटलो. म्हणालो, हवे तर नामांतराचे श्रेय तुम्ही घ्या, पण काम तर करा. तेही काही करत नाहीत. पालकमंत्री रामदास कदम यांनाही मी पत्र दिले. परंतु प्रतिसाद नाही. त्यामुळे मी संतप्त होतो. सर्व म्हणतात, खैरे काहीबाही बोलतात. परंतु मी बोलतच राहणार. शहराचे नाव संभाजीनगर असावे, ही बाळासाहेबांची इच्छा होती. ती पूर्ण झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.’ खैरेंचे पालकमंत्री कदमांशी पटत नाही. या मुद्द्याद्वारे त्यांना शह देण्याचा हा प्रयत्न असल्याचेही बोलले जाते.

 

शिवसेनेचे मंत्रीही लक्ष घालत नाहीत...
औरंगाबादच्या नामकरणाच्या कामात शिवसेनेचे मंत्रीही लक्ष घालत नसल्याचे सांगत खैरेंनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. राज्यात आणि केंद्रात एनडीएचे सरकार आहे. नामकरणाची प्रक्रिया करणे सहज शक्य आहे. मुख्यमंत्र्यांनी गेल्या तीन वर्षात त्यासाठी चार पत्र लिहिली आहेत. ते केवळ 'आपण करु', एवढेच उत्तर देतात, असे खैरेंनी सांगितले. 

 

पुढील स्लाइडवर क्लि करून वाचा...  काय आहे औरंगाबादच्या नामकरणाचा इतिहास...?

बातम्या आणखी आहेत...