आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काॅपी पकडल्याने विद्यार्थ्याची आत्महत्येची धमकी, तिसर्‍या मजल्यावरुन उडी मारण्याचा प्रयत्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- एमपीएड परीक्षेच्या पहिल्याच पेपरमध्ये विद्यार्थ्याने कॉपी घेऊन जाण्यास मज्जाव केल्याने महाविद्यालयाच्या अकाऊंटंटच्या कानाखाली लगावली. एवढेच नाही तर त्याने तिेसर्‍या मजल्यावरून उडी मारण्याचाही प्रयत्न केला. महाविद्यालय प्रशासनाने याबाबत माहिती दिली असता पोलिस घटनास्थळी पोहोचले असून क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 


खोकडपुरा येथील विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयात आज (मंगळवार) एमपीएडचा पहिला पेपर सुरु होता. त्यावेळी सतीश राजू वाघमारे (२९) विद्यार्थी कॉपी घेऊन आला होता. त्याची काॅपी पकडल्यानंतर त्याने अकाउंटंटच्या कानाखाली लगावली. त्याला प्राध्यापकांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिसर्‍या मजल्यावरुन उडी मारण्याचा प्रयत्न केला. प्राध्यपकांनी त्याला वेळीच रोखले. त्याचा हा कारनामा काॅलेजमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमरेर्‍यात कैद झाला असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. 

 

एकाच महिन्यातले तिसरे प्रकरण
काही दिवसांपूर्वी एमआयटीच्या नर्सिंगच्या एका विद्यार्थ्याने काॅपी पकडल्याने पाचव्या मजल्यावरुन उडी मारली होती. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तसेच चार दिवसांपूर्वी एका बीएडच्या विद्यार्थ्याने काॅपी पकडल्याने त्याने परीक्षा केंद्रात गोंधळ घालत आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. 

बातम्या आणखी आहेत...