आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला नोटीस,Mumbai Highcourt Notice To Babasaheb Ambedkar Marathwada University

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला नोटीस, 2 वर्षांपासून विद्यार्थीनीचा निकाल रखडला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- एमएच्या विद्यार्थिनीचा पेपर गहाळ केल्यानंतर पुन्हा परीक्षा घेण्यात आली. मात्र दोन वर्षांपासून निकाल राखून ठेवल्याने विद्यार्थिनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला व न्यायमूर्ती सुनील कोतवाल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला नोटीस बजावली आहे.    


पैठणच्या प्रतिष्ठान महाविद्यालयाची विद्यार्थिनी आम्रपाली वदगे हिने ३१ मार्च २०१५ रोजी एम. ए. हिंदी द्वितीय वर्षाची परीक्षा दिली होती. मात्र परीक्षा अन्वेषकाच्या निष्काळजीपणाने उत्तरपत्रिका गहाळ झाली. त्यानंतर विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून विद्यापीठाने परीक्षा अन्वेषक डॉ. सुवर्णा पाटील व अजय पाटील यांना दोन वर्षे परीक्षा घेण्याच्या प्रक्रियेपासून निलंबित केले. त्याचप्रमाणे विद्यार्थिनीने पुन्हा पेपर द्यावा असे स्पष्ट केले. त्यानुसार आम्रपाली वदगे हिने पुन्हा पेपर दिला. मात्र विद्यापीठाने आतापर्यंत  निकाल जाहीर केला नाही. त्याविरोधात विद्यार्थिनीने खंडपीठात धाव घेऊन अॅड. विकास नवाथे यांच्यामार्फत याचिका दाखल केली. प्राथमिक सुनावणीत खंडपीठाने विद्यापीठाला नोटीस बजावली.

 

बातम्या आणखी आहेत...