आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जून्या वादातून दोन गट भिडले, गंगापूरात सुऱ्याने वार करून एकाचा खून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगापूर- शहरापासून तीन कि.मी. अंतरावर असलेल्या नवाबपूर शिवारात पारधी समाजातील दोन गटात झालेल्या अंतर्गत वादामध्ये एका जणाचा खून झाल्याची घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली. यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पारधी समाजाच्या दोन गटांमध्ये खुनाच्या गुन्ह्यात अडकवल्याचा राग धरून आज दि. १४ रोजी पहाटे दोन ते अडीच वाजेच्या सुमारास श्रीधर काळे (वय ६०) याचा सुऱ्याच्या साहाय्याने पोटात व डोक्यात वार करून निर्घृण खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने प्रेत गोधडीमध्ये गुंडाळून नवाबपूर शिवारातील उसाच्या शेतात टाकून दिले. 


या प्रकरणी मृताची पत्नी सुमनबाई श्रीधर काळे यांच्या फिर्यादीवरून रवींद्र श्रीमंत भोसले वय २१ व शहानूर सुभाष पिंपळे ऊर्फ चव्हाण वय १९ या दोन आरोपींना पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर ३०२, २०१, ३४ या कलमान्वये गुन्हे दाखल केले असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अविनाश सोनवणे, पोलिस निरीक्षक सुनील बिर्ला, पोलिस उपनिरीक्षक जमधडे हे करीत आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...