आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेडमधील गावांची तेलंगणमध्ये समावेश करण्याची मागणी, के. चंद्रशेखर राव यांना दिले पत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- राज्य सरकारकडून होणाऱ्या दुर्लक्षाला कंटाळून महाराष्ट्र –तेलंगण सीमेवरील धर्माबाद तालुक्यातील ग्रामस्थांनी गावांचा तेलंगणात समावेश करण्याची मागणी केली आहे. त्यांनी अशा प्रकारचे पत्र तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना दिले आहे. 

 

नांदेड जिल्ह्यातील महाराष्ट्र- तेलंगण सीमेवरील धर्माबाद  तालुक्यात तेलगू भाषिकांची संख्या लक्षणीय आहे. या तालुक्यातील सीमेलगतच्या गावांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.  गावक-यांच्या म्हणण्यानुसार, तेलंगण व महाराष्ट्रातील सोयीसुविधांमध्ये खूप फरक आहे. रस्त्यांपासून ते कृषी योजनांच्या अंमलबजावणीत तेलंगण महाराष्ट्रापेक्षा आघाडीवर असल्याची भावना येथील लोकांमध्ये आहे. 

 

धर्माबादमधील सरपंच संघटनेचे अध्यक्ष बाबूराव पाटील कदम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तेलंगणातील निझामाबाद येथे तेलंगण राष्ट्र समितीच्या खासदार कविता यांची भेट घेतली. शिष्टमंडळाने कविता यांना एक पत्र दिले आहे. या पत्रात त्यांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांकडे धर्माबाद तालुक्यातील गावांचा तेलंगणात समावेश करावा, अशी मागणी केली आहे.

 

गावक-यांच्या म्हणण्यानुसार तेलंगणातील सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफ केले आहे. त्यांना २४ तास वीज आणि पाच लाखांचा जीवन विमा देखील सरकारकडून दिला जात आहे. तसेच दोन्ही हंगामात पेरणीसाठी 4 हजार रुपयांची आर्थिक मदतही दिली जाते. या सोयीसुविधांमुळे आम्हाला देखील तेलंगणात जायचे आहे. 

बातम्या आणखी आहेत...