आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना उत्पन्नाच्या दीडपट भाव म्हणजे लबाडाघरचे आवतण; पवारांचा हल्‍लाबोल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- उत्पन्न खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची केंद्राची घोषणा हा खोटा डाव आहे. दीडपट हमीभाव दिला जाईल, असे एकीकडे सांगितले जात असले तरी दुसरीकडे उत्पन्न खर्च कमी दाखवण्यात येत आहे. हा प्रकार म्हणजे लबाडाच्या घरचे आवतण आहे. जोपर्यंत खिशात पडत नाही तोपर्यंत काहीही खरे नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केंद्र सरकारवर केली.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १ डिसेंबरपासून राज्यात सुरू करण्यात आलेल्या सरकारविरुद्ध हल्लाबोल मोर्चाचा समारोप शनिवारी औरंगाबादेत मोर्चाने झाला. या वेळी जाहीर सभेत शरद पवार बोलत होते.

 

पोलिस बंदोबस्तात राष्ट्रवादीचा हा हल्लाबोल माेर्चा निघाला. क्रांती चौक ते दिल्ली गेट असा या मोर्चाचा मार्ग होता. या वेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मोर्चात ६० हजार लाेक सहभागी झाल्याचा दावा केला. सुमारे ६०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

 

तलाक कुराणाचा संदेश,  हस्तक्षेपाचा अधिकार नाही
- तलाक हा  कुराण आणि पैगंबरांनी दिलेला मार्ग, संदेश आहे. त्यात हस्तक्षेपाचा कोणालाही अधिकार नाही. धर्मगुरूंना विश्वासात घेऊन पुढील पाऊल टाकता येईल, अशा शब्दांत ट्रिपल तलाक विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेसचा कडाडून विरोध असेल, असेही पवारांनी स्पष्ट केले.
- शेतकऱ्यांना आशेला लावायचे. तोपर्यंत निवडणूक निघून जाईल, हमीभावाचे आश्वासन म्हणजे लबाडाच्या घरचे आवतण आहे. ते जोपर्यंत खिशात पडत नाही तोपर्यंत काही खरे नसल्याचे पवार म्हणाले.

 

यूपीएने १० दिवसांत ७१ हजार कोटींची कर्जमाफी दिली...

यूपीए सरकारने शेतकऱ्यांना ७१ हजार रुपयांची कर्जमाफी अवघ्या १० दिवसांत केली. थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले. या सरकारने कर्जमाफी जाहीर करून ८ महिने लोटले तरी कोणालाही पैसे मिळाले नाहीत. बेरोजगारी, महागाईबरोबरच हे सरकार दंगलीही देत आहे. उत्तर प्रदेशमध्ये  प्रजासत्ताक दिनाची तयारी करणाऱ्यांवर हल्ला केला जातोय. हा प्रकार थांबवण्यासाठी तरुणांनी समोर यावे, असे आवाहनही त्यांनी केले. व्यासपीठावर प्रफुल्ल पटेल, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, फौजिया खान, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते.

 

 सरकार करत असलेल्या दाव्याला आधार काय?
२५ पिकांना हमीभाव देऊन ‘शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवले जाणार असल्याचे सांगण्यात येते. परंतु ते शक्य होणार नाही. कारण आज कोणत्याही गावात खरेदी यंत्रणा नाही आणि खरेदी केलेले धान्य साठवण्यासाठीही यंत्रणा नाही. तर मग कशाच्या आधारावर सरकार असा दावा करतेय, असे पवार म्हणाले.

 

शेतकरी आत्महत्याचे देखावा

हल्लाबोल मोर्चाच्या सुरुवातील शेतकरी आत्महत्येचा देखावा करण्यात आला होता. क्रांतीचौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मोर्चा पैठणगेट, सिटी चौक, शहागंज मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर पोहोचला. 
- मोर्चामध्ये महिला आणि मुलींची संख्या लक्षणीय होती. त्यासोबतच संपूर्ण मराठवाड्यातून कार्यकर्ते आले होते.  
- मोर्चाच्या पूर्वसंध्येला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सभा स्थळाची पाहाणी केली होती.

- मोर्चामध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी कोल्हापूरातून संबळकरी आणण्यात आले होते. 

 

केव्हा सुरु झाली हल्लाबोल यात्रा 
- राष्ट्रवादी काँग्रेसने 16 जानेवारी रोजी तुळजापूर येथून हल्लाबोल यात्रा सुरु केली होती. मराठवाड्यातील विविध शहरातून ही यात्रा निघाली. 3 फेब्रुवारी रोजी हल्लाबोल यात्रेचा औपचारिक समारोप औरंगाबादेत झाला आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार त्याचे नेतृत्वात यावेळी विभागीय आयुक्तालयावर मोर्चा निघाला. 

- या मोर्चात अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधीमंडळ गटनेते जयंत पाटील, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांच्यासह पक्षाचे मराठवाड्यातील आमदार उपस्थित होते. 

 

मोर्चा मार्गातील दगड-गोटे साफ करण्याचे आदेश 
- विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सभा घेण्यासाठी प्रशासनाने सुरुवातीला परवानगी नाकारली होती. 
- सभेच्या एक दिवसआधी पोलिस प्रशासनाने सभेला परवानगी दिली आहे. 
- क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय या मोर्चाच्या मार्गात कोठेही दगड, गोटे असता कामा नये असे पत्र पोलिस आयुक्तालयाने औरंगाबाद महानगर पालिकेला दिले आहे. 

 

पुढील स्लाइडवर पाहा, महिलांचा उत्साह, केला डान्स 

बातम्या आणखी आहेत...