आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिटी चौक, जवाहरनगर ठाण्याला नवीन पीआय; शहरातील पाच पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सिटी चौक, जवाहरनगरसह बॉम्बशोधक नाशक-पथक, पोलिस मुख्यालयातील दोन पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. पोलिस महासंचालक कार्यालयातून शुक्रवारी राज्यातील ११९ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात शहरातील पाच निरीक्षकांची नावे आहेत. या पाचही जणांनी पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत किमान सहा वर्षे सेवा पूर्ण केली आहे. 


या   बदल्या विनंती अर्ज आणि प्रशासकीय कारणांवरून झाल्या आहेत. शहरासाठी बाहेरून नव्याने चार निरीक्षक येत आहेत. औरंगाबादला बदली झालेल्या चारपैकी तीन निरीक्षक राजकुमार सोनवणे (लातूर), अनिल गायकवाड आणि संदीप गुरमे (दोघे नांदेड) हे नांदेड परिक्षेत्रातील आहेत. विशेष म्हणजे नव्याने येणारे पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसादही याच परिक्षेत्रातील आहेत. याशिवाय ठाणे येथून उद्धव जाधव येणार आहेत. शहरातील शिवाजी कांबळे यांची बुलडाणा, जवाहरनगरचे अविनाश आघाव यांची औरंगाबाद दहशतवादविरोधी पथक, सिटी चौकचे हेमंत कदम यांची बीडला आणि विशेष शाखेचे निरीक्षक सुरेश वानखेडे यांची महामार्ग सुरक्षा विभागात, तर बॉम्बशोधक नाशक -पथकाचे सुशील जुमडे यांची अमरावतीला बदली झाली. गेल्या दीड महिन्यापासून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची चर्चा सुरू होती. 

बातम्या आणखी आहेत...