आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१५१ दिवस : प्रगती शून्य, कचऱ्यात शहर संपूर्ण ! मनपा आजही १६ ऑक्टोबर २०१७ ला होती तेथेच!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- १६ फेब्रुवारीला सुरू झालेल्या कचराकोंडीचा मंगळवारी १५१ वा दिवस होता. कचराकोंडी आता द्विशतकाकडे वाटचाल करत आहे. असे असतानाही महापालिका आजही १६ ऑक्टोबर २०१७ ला होती तेथेच आहे. दीर्घकालीन प्रकल्पासाठी निघालेल्या निविदा एवढीच काय ती प्रगती. गतवर्षी १६ ऑक्टोबरला एेनदिवाळीत नारेगावकरांनी कचराकोंडी करून चार महिन्यांची मुदत दिली होती. या मुदतीत प्रक्रिया प्रकल्प उभा करता आला असता. पण महापालिकेने काहीही केले नाही. त्यानंतर १६ फेब्रुवारीला थेट कचराकोंडी झाली. तेव्हाही हातपाय हलवले असते पण महापालिकेने जागेचा शोध घेण्यापलीकडे काहीही केले नाही. त्यानंतर ९ मार्च २०१८ रोजी नगर विकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी औरंगाबादेत बैठक घेऊन कचराकोंडीपासून मुक्तीचा कालबद्ध आराखडा जाहीर केला आणि दोनच दिवसांत ८९ कोटी रुपये मंजूर केले तेव्हापासून अमल झाला असता तर कदाचित आज प्रकल्प उभा दिसला असता. 


औरंगाबाद खंडपीठाचीही महापालिकेकडून दिशाभूल 
मनपाने औरंगाबाद खंडपीठात सादर केलेल्या आराखड्यानुसार ३१ मेपर्यंत पूर्ण कचरा ओला व सुका असा जमा केला जाणार होता. मात्र मनपाने तातडीने पावले उचलली तर नाहीच, शिवाय आराखड्यानुसार कामही केले नाही. त्यामुळे मनपाने वेळ मारून नेण्यासाठी कोर्टात दिशाभूल करणारा आराखडा ठेवल्याचे स्पष्ट होते. 

बातम्या आणखी आहेत...