आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कैऱ्यांच्या चेंडूने शेतात गिरवले क्रिकेटचे धडे; क्रिकेटर संजय बांगर यांनी उलगडला जीवनप्रवास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- माझा जन्म बीड जिल्ह्यात झाला. आजी-आजोबांसोबत शेतात जायचो. कैरीचा चेंडू अन् बैलगाडीच्या दांड्यांचा स्टम्प करून शेतात क्रिकेट खेळलो. गावाकडचा कणखरपणा आणि भारतीय रेल्वेकडून क्रिकेट खेळताना झालेले संस्कार अनेक ठिकाणी कामी आले. 'मृत्युंजय'मधील कर्ण, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांची चरित्रे वाचल्याने वाचनाचे बाळकडू मिळाल्याच्या   आठवणी भारतीय क्रिकेट संघाचे सहायक प्रशिक्षक संजय बांगर यांनी सोमवारी रेअर -शेअर कार्यक्रमात सांगितल्या. 


देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात औरंगाबाद मॅनेजमेंट असोसिएशनने आयोजित केलेल्या ५१ व्या रेअर शेअर कार्यक्रमात संजय बांगर यांनी अापला जीवन प्रवास उलगडला. ते म्हणाले, शालेय शिक्षण औरंगाबादमध्ये झाले. किरण जोशी हे माझे पहिले गुरू. त्यानंतर सुनील गावस्कर यांना शिकवलेले वसंत अमलाडी यांनी पुढची दिशा दिली. मराठवाड्यातून मुंबईला गेल्यावर मुंबईकर खूप पुढे आहेत, असे वाटत होते. पण मी मेहनत करून रणजीपर्यंत पोहोचलो. पुढे रेल्वेत नोकरी करून दक्षिण रेल्वेकडून खेळलो. भारतीय संघात वयाच्या 29 व्या वर्षी संधी मिळाली.


माेठी स्वप्ने पाहा 
मराठवाड्यातील खेळाडू मागे का पडतात, या प्रश्नावर बांगर म्हणाले, मराठवाड्यातील खेळाडूंनी आत्मपरीक्षण करावे. कारण आता खूप संधी आहेत. मेरिटवरच सर्वकाही होते. मोठी स्वप्ने पाहिली तर निश्चितच येथील खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकू शकतील. 

बातम्या आणखी आहेत...