आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा शहरालगत 4 ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्रे उभारणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात करण्यात येत असलेल्या कार्यवाहीविषयी राज्य शासन आणि महानगरपालिकेच्या वतीने मंगळवारी (१० एप्रिल) दाखल करण्यात आलेले शपथपत्र न्यायालयाने रेकॉर्डवर घेतले. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संभाजीराव पाटील आणि न्या. एस. एम. गव्हाणे यांनी कचरा निर्मूलन कायद्यानुसार मनपा कशा पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावत आहे, याबाबत सुस्पष्ट शपथपत्र सादर करण्याचे निर्देश दिले. सुनावणीप्रसंगी चिकलठाण्यासह अजून तीन ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्र उभारणार असून, यावर बुधवारी (११ एप्रिल) निर्णय घेण्यात येईल, असे मनपाने न्यायालयास सांगितले. 
शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात मूळ याचिकाकर्ता राहुल कुलकर्णी यांनी दाखल केलेला दिवाणी अर्ज आणि तिसगाव, मिटमिटा, कांचनवाडी येथील नागरिकांनी दाखल केलेल्या जनहित याचिकांवर मंगळवारी सुनावणी झाली.
बातम्या आणखी आहेत...