आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'त्या' विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचा प्रश्न अनुत्तरित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका जळाल्याची घटना केज तालुक्यात घडली होती. या प्रकरणास दहा ते बारा दिवस उलटूनही या विद्यार्थ्यांबाबत काय निर्णय घेतला, याबाबत बोर्डाकडून काहीही सांगण्यात आले नाही. या संदर्भात विभागीय शिक्षण मंडळात विचारणा केली असता निर्णय राज्य मंडळाच्या हाती असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, निर्णय होत नसल्याने विद्यार्थी मात्र पुन्हा पेपर द्यावा लागेल का, या चिंतेत आहेत. 

 

कस्टोडियनने ठेवलेल्या उत्तरपत्रिकांना आग लागल्याची घटना केज तालुक्यात घडली होती. यात दहावी-बारावीच्या दीड हजाराहून अधिक उत्तरपत्रिका जळाल्या होत्या. या प्रकरणात १४ जणांना निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणास दहा दिवस उलटले असून २२ मार्चपर्यंत परीक्षाही संपणार आहेत. तरी ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जळाल्या त्यांना पुन्हा पेपर द्यावा लागणार की एकूण निकाल पाहून सरासरी गुण देऊन या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाईल. याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. दरम्यान, या प्रकरणाचा अहवाल राज्य मंडळास पाठवण्यात आला असून तेच अंतिम निर्णय घेतील, असे बोर्डाच्या विभागीय सचिव सुगता पुन्ने यांनी सांगितले. परीक्षा समितीशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे राज्य मंडळाच्या अध्यक्ष डॉ.शकुंतला काळे यांनी सांगितले. 

 

बातम्या आणखी आहेत...