आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थायलंडमुळे चर्चेत 'किर्लोस्कर'ला १० वर्षांपूर्वी मनपाने पैशापायी पिटाळले होते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- थायलंडच्या गुहेत फुटबॉल संघाची मुले अडकल्याने जगाचे लक्ष वेधले गेले. जगभरातील तज्ज्ञ मदतीला धावले. त्यात मराठमोळी किर्लोस्कर कंपनीही होती. मोटारपंप उत्पादन व पाणीपुरवठा क्षेत्रात कार्यरत किर्लोस्करने १३ कोटी लिटर पाणी काढून मुलांना बाहेर पडण्याचा मार्ग सुकर केला. 


याची आठवण काढण्याचे कारण की, ही कंपनी पाणीपुरवठ्याच्या क्षेत्रातही काम करते आणि २००६ मध्ये महापालिकेने काढलेल्या निविदाही या कंपनीने भरल्या होत्या. फारोळ्यापर्यंत पाणी आणून देण्याबरोबरच ते शुद्ध करून महापालिकेला देण्याची ही निविदा होती. अवघ्या दोन वर्षांत प्रकल्प उभारून देतो आणि पुढील २० वर्षे चालवतो, असा त्यांचा प्रस्ताव होता. मात्र, आपल्या पदाधिकाऱ्यांना नेहमीप्रमाणे 'आमचे काय?' असा प्रश्न पडला. 'कंपनीत बिल सादर करून जे काही देता येईल तेवढेच मी देऊ शकतो' असे कंपनीच्या अधिकाऱ्याने स्पष्ट शब्दांत सांगितले होते. आम्ही पैसे देऊ शकत नाही. त्या बदल्यात २० वर्षांनंतर सर्व यंत्रसामग्री बदलून देऊ आणि आणखी पाच वर्षे सेवा करू, असे त्यांनी स्पष्ट केले होते. परंतु आपल्या पदाधिकाऱ्यांना पैशांची पडली होती. त्यामुळे २००८ मध्ये या कंपनीशी करार करण्यास नकार दिला.


टक्केवारीमुळे घेतला नाही पाणीपुरवठा प्रकल्प 
पूर्वी नांगर आणि नांगराचे फळे बनवणारी कंपनी अशी या कंपनीची ओळख मराठी मनात आहे. ही कंपनी आखाती, युरोपियन देशांत पाणीपुरवठा क्षेत्रात काम करते. पाश्चिमात्य जगतातही त्यांचा दबदबा आहे. ते कधीही कामाच्या दर्जाबाबत तडजोड करत नाहीत. त्यामुळे टक्केवारी देऊन काम करणे त्यांच्या तत्त्वात नाही. याच तत्त्वामुळे ते औरंगाबादचा प्रकल्प घेऊ शकले नाहीत. इकडे आपल्याकडे टक्केवारी मिळाल्याशिवाय आपण कोणालाही काम देत नाही. या आपल्या तत्त्वामुळे आपण त्यांना काम दिले नाही. 

बातम्या आणखी आहेत...