आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाजनको कॉपी प्रकरण: उमेदवारांकडून लाख घेऊन तो द्यायचा परीक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- महाजनकोच्या परीक्षेत उमेदवारांना डिजिटल कॉपी पुरवणाऱ्या टोळीचा म्हाेरक्या अर्जुन घुसिंगे (२३, रा. बेलाची वाडी) याला दोन दिवसांपूर्वी त्याच्या गावातून अटक करण्यात आली. सहा लाख रुपये घेऊन त्याने अहमदनगर येथे डमी उमेदवार म्हणून परीक्षा दिल्याचे तपासात समोर आले आहे. हॉल तिकिटावर फोटो, कागदपत्रावर स्वाक्षरी असूनही तो डमी उमेदवार म्हणून परीक्षा कशी द्यायचा याचा शोध पोलिस घेत आहे. यामागे मोठे रॅकेट असून यात संबंधितविभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. 
तब्बल दोन महिने गुंगारा दिल्यानंतर अर्जुन पोलिसांच्या ताब्यात सापडला. महाजनकोची परीक्षा सुरू असताना मायक्रोफोनच्या आधारे उमेदवाराला घरी बसून उत्तरे सांगणाऱ्या टोळीचा पर्दाफाश मुकुंदवाडी पोलिसांनी केला होता. त्याचवेळी तो पोलिसांच्या हातातून निसटला होता. परसोडा येथील शेख रिझवान याला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती. तोदेखील डमी उमेदवार म्हणून दुसऱ्यांच्या जागी परीक्षेला बसत होता. रिझवान आणि अर्जुन यांनी ज्या केंद्रावर परीक्षा दिली, तेथील अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात येणार आहेत.

 
दोन वर्षांपूर्वी झालेल्या जेल पोलिस भरती, राज्य राखीव दल भरतीच्या वेळी अशा प्रकारे डमी आणि डिजिटल कॉपी प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली होती. ही टोळी किती वर्षांपासून कार्यरत आहे, यात सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे का, किती उमेदवारांना त्यांनी अशा प्रकारे पास करून दिले याचा तपास पोलिस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हारुण शेख यांचे पथक करत आहे. 


उमेदवार आणणाऱ्यांना मिळायचे दहा हजार 
औरंगपुऱ्यातीलएका शिकवणीत स्पर्धा परीक्षेची तयारी करताना रिझवानसोबत अर्जुनची मैत्री झाली होती. सरकारी निमशासकीय नोकरीसाठी परीक्षा देणाऱ्या तरुणांकडे ही टोळी लक्ष ठेवून असायची. एकदा प्रयत्न केल्यानंतर निराशा पदरी पडलेल्या तरुणांना ते पास करून देण्याचे आमिष दाखवत. अर्जुन गिऱ्हाईक आणणाऱ्याला १० ते १५ हजार रुपये कमिशन देत असे. 

बातम्या आणखी आहेत...