आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड बायपासवर अपघात रोखण्यासाठी जड वाहनांना ताशी ४० किमी वेगाचा ब्रेक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- बीड बायपासवरील अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी मंगळवारपासून नवीन प्रयोग सुरू केला. जड वाहनांनी वेग मर्यादा पाळावी यासाठी जालन्याकडून येणारी वाहने झाल्टा फाट्याजवळ तर पुण्याकडून येणारी वाहने एएस क्लबजवळच अडवण्यात येत आहेत. ४० वाहने एकत्र करून पोलिस पायलटिंग करून त्यांना शहराबाहेर सोडत आहेत. 


बीड बासपासवर दिवसाआड किमान एक अपघाती मृत्यू होतो. त्यामुळे मृत्यूचा बायपास अशीच या रस्त्याची ओळख बनली आहे. या ठिकाणी सर्व्हिस रोडची मागणी जोर धरत असताना पोलिसांनी मंगळवारपासून हा नवीन उपक्रम सुरू केला. सकाळी ८ ते दुपारी १ आणि दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत हे पायलटिंग सुरू असेल. शिवाय वेग मर्यादा मोडणाऱ्या जड वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. मंगळवारी अशा आठ वाहनांवर कारवाई करून प्रत्येकी १ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. 


बीड बायपासवर आजवर दोन प्रयोग, फायदा शून्य 
- दोन वर्षांपूर्वी तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी बीड बायपासवरील लोकांनी फोडलेले दुभाजक बंद केले. शिवाय दिवसभर जड वाहनांना प्रवेश बंदी केली होती. 
- वर्षभरापूर्वी तत्कालीन पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी अपघात रोखण्यासाठी व जड वाहनांना वेग मर्यादा असावी म्हणून स्पीड गन लावल्या होत्या. पोलिसांची गस्तही वाढवली. स्वतंत्र वाहतूक पोलिस चौकीची घोषणा केली, ती हवेतच विरली. 

बातम्या आणखी आहेत...