आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदी, फडणवीसांमुळे ज्यांची दुकाने बंद झाली तेच आता जातीय तणाव निर्माण करतात : गडकरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सत्तेत आल्यानंतर अनेकांची दुकाने बंद झाली, त्यामुळेच त्यातील काही लोक आता समाजात जातीय तणाव निर्माण करण्याचे काम करत आहेत. असा आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. गडकरी नांदेडमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. 

 

मुख्यमंत्र्यांचे केले अभिनंदन 
गडकरी यांनी आपल्या भाषणात जलयुक्त शिवारच्या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. त्यांनी मराठवाड्याला केंद्रीय जलसंधारण विभागाकडून एक लाख कोटीचा निधी देण्याची घोषणाही केली. शिवाय लातूरला रेल्वेने पाणी दिलं तो महाराष्ट्रातील काळा दिवस होता, असंही ते म्हणाले. गडकरी म्हणाले की वीज, पाणी आणि रस्ते हे विकासात अत्यंत महत्त्वाचे असतात. जो ज्या जातीचा असतो तो कधीच त्या जातीचा विकास करत नाही.  

बातम्या आणखी आहेत...