आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीतीच्या मिसाइलने अानंदाची वातावरणनिर्मिती! दक्षिण कोरियातील डेझाॅन येथून औरंगाबादचा विद्यार्थ्याची माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अाैरंगाबाद- उत्तर काेरियाचा हुकूमशहा किम जाेंगच्या भेटीच्या बातमीने दक्षिण काेरियातील नागरिकांमध्ये शुक्रवारी सुरुवातीला प्रचंड भीती पसरली हाेती. मात्र, किम जाेंगने २८ सेकंद द. काेरियाचे राष्ट्रपती मून जईसाेबत हस्तांदाेलन केले अाणि भीतीच्या मिसाइलने काही क्षणांतच स्थानिक नागरिकांमध्ये अानंदाची वातावरणनिर्मिती झाली. किम जाेंगचा हा मैत्रीपूर्ण एेतिहासिक भेटीचा नवा फाॅर्म्युला पाहण्यासाठी राजधानी सेऊलसह अवघ्या दक्षिण काेरियात उत्सुकतेचे वातावरण हाेते. माेठ्या स्क्रीनच्या टीव्हीवर हा एेतिहासिक क्षण लाइव्हच्या माध्यमातून अनेकांनी 'याचि देही याचि डाेळा' पाहिला, अशी माहिती औरंगाबादचा अक्षय ताकवाले याने खास 'दिव्य मराठी'ला दिली. ताे सध्या दक्षिण काेरियातील डेझाॅन येथील यूएसटी विद्यापीठामध्ये 'मेडिसिन केमिस्ट्री' या विषयात दीड वर्षांपासून पीएचडी करत अाहे. 


स्क्रीनवर मैत्रीपूर्ण भेटीने साेहळा
हुकूमशहा किम जाेंगच्या राष्ट्रपती मून यांच्यासाेबतच्या मैत्रीपूर्ण भेटीचा साेहळा दक्षिण काेरियातील नागरिकांसाठी एेतिहासिक ठरला. माेठ्या स्क्रीनच्या टीव्हीवर हा क्षण पाहण्यासाठी ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात अाली हाेती. त्यामुळे सरकारी कार्यालयासह शैक्षणिक संस्थांमध्येही यासाठी माेठ्या संख्येत नागरिकांची गर्दी हाेती. अामच्यासाठी विद्यापीठामध्ये खास व्यवस्था करण्यात अाली हाेती, असे अक्षय म्हणाला. 


अभ्यासकांकडून माहिती 
आता शांतता यशस्वीपणे नांदेल. त्यासाठी दाेन्ही देशांचे नागरिक प्रयत्नशील राहतील, अशी माहिती विद्यापीठातील अभ्यासकांनी दिली. हा साेहळा लाइव्ह सुरू असताना जुन्या जाणकार अभ्यासकांची उपस्थिती हाेती. 

बातम्या आणखी आहेत...