आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसऱ्या मुलाशी बोलल्याचा राग, मैत्रिणीचे आक्षेपार्ह फोटो केले व्हायरल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- दुसऱ्या मुलासोबत बोलणे सुरू केले म्हणून मित्राने मैत्रिणीचे आक्षेपार्ह छायाचित्र फेसबुकवरून व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तरुणीने बेगमपुरा पोलिसांत तक्रार केली. त्यावरून शुभम पंडित जाधव (रा. जगदीशनगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार तरुणी व शुभम हे चांगले मित्र होते. 


आठ महिन्यांपूर्वी त्यांच्यात वाद झाले. तू बेनसीन नावाच्या तरुणासोबत का बोलतेस, असे म्हणत शुभमने वाद घातल्याने तरुणीने त्याच्याशी बोलणे बंद केले. परंतु त्याने पाठलाग सुरू केला. तुझी फेसबुकवर बदनामी करेन, असेही धमकावले. तिने दुर्लक्ष केल्यानंतर त्याने फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करून तरुणीचे आक्षेपार्ह छायाचित्र मित्रांना पाठवून व्हायरल केले. पोलिस निरीक्षक राजश्री आडे तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...