आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड लाख ब्लॅक अँड व्हाइट मतदान कार्ड बदलणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औैरंगाबाद- जिल्ह्यात २६ लाख मतदार असून यातील १ लाख ६३ हजार जणांच्या मतदान कार्डावर ब्लॅक अँड व्हाइट फोटो आहेत. ते बदलण्यासाठी निवडणूक विभाग १६ मे ते ३० जूनदरम्यान मोहीम राबवणार आहे. जिल्ह्यात २५७७ बीएलओ मतदारांच्या घरोघरी जाऊन फॉर्म भरून घेणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी दिली. शेळके म्हणाले, बीएलओ मतदारांच्या घरी जाऊन माहिती भरून घेणार आहेत. फॉर्म भरून होताच त्यांना कलर फोटो द्यावे लागतील. अॅपच्या माध्यमातून ते अपलोड केले जातील. तसेच त्या कुटुंबाची माहितीही भरून घेतली जाणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...