आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भोकरदनमध्‍ये अज्ञात वाहनाने दुचाकीस्‍वाराला चिरडले, वेगवेगळ्या अपघातात 6 जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन- सिपोरा बाजार येथून हाकेच्‍या अंतरावर असलेल्‍या बोरगाव फाट्याजवळ दुचाकीला मागून अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्‍याने एकाचा जागीच मृत्‍यू झाला आहे. दत्‍ता अन्‍नाराव इंगळे असे मृत्‍यूमुखी पडलेल्‍या व्‍यक्‍तीचे नाव आहे. दत्‍ता इंगळे आणि रमेश गायकवाड हे दोघे माहोरा येथे जात असताना हा अपघात झाला. यामध्‍ये रमेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले आहेत.

 

याशिवाय या वाहनाने समोरून येणा-या दुस-या दुचाकीलाही जोराची धडक मारल्‍याने यात संतोष दामु मतकर हे जखमी झाले आहेत. यातील दोघांना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अज्ञात वाहनाचा पोलीस तपास करत आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

 

दुसरा भीषण अपघात शहरापासुन 3 की.मी अंतरावर असलेल्या विरेगावजवळ झाला.  भोकरदनहून जाफराबाद कडे जाणा-या कारने (एम एच २८.V.९३.४५)  भोकरदन कडे येणाऱ्या दोन दुचाकीला समोरासमोर धडक दिल्‍याची माहिती आहे.  यात पंढरीनाथ दगडुबा चव्हाण (वय ६०), सकुबाई भगवान आढावे (वय ६०), कृष्णा शिवराम हिवाळे (वय २९), समाधान संजय दाभाड़े (वय २७), अरूणा बाई संजय दाभाड़े (४०) हे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार करून त्‍यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो..

बातम्या आणखी आहेत...