आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरट्यांच्या हल्ल्यात एक भाऊ ठार, दुसरा जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुलंब्री - बैल चोरण्याच्या इराद्याने आलेल्या चोरट्यांनी शेत वस्तीवर बैलाची राखण करणाऱ्या दोघा भावांपैकी एकाच्या डोक्यात  दगड घालून ठार केले, तर दुसऱ्याला धारदार शस्त्राने मारून गंभीर जखमी केले. ही घटना तालुक्यातील डोंगरगाव कवाड शिवारात रविवारी (दि. २७) पहाटे उघडकीस आली. समाधान रंगनाथ पवार (१९) असे   मृताचे नाव असून अजिनाथ  (२२) याच्यावर औरंगाबाद येथे घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला.  


डोंगरगाव कवाड शिवारात रंगनाथ  पवार यांची  शेतजमीन आहे. त्यांनी शेतात  घर बांधलेले आहे. नेहमीप्रमाणे रात्री जनावरांची राखणदारी करण्यास गेलेले समाधान व अजिनाथ हे दोघे भाऊ  शनिवारी (दि. २६ ) रात्री शेतातील घराच्या गच्चीवर झोपी गेले. रविवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी गोठ्यात बांधलेले बैल सोडत असल्याचे या दोघांच्या लक्षात आले.  त्यांनी चोरांना हटकण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी घराच्या गच्चीवर जाऊन दोघा भावांना मारहाण केली. दरम्यान, समाधानच्या डोक्यात दगड घातला, तर अजिनाथला चाकूने  मारहाण केली. आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे काही नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली असता चोरट्यांनी पळ काढला. समाधान पवार यंच्या डोक्यात चोरट्यांनी दगड घातल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर   अजिनाथ   याला चाकूने मारहाण केल्याने त्याला गंभीर दुखापत झाली.  त्याच्यावर  घाटीतील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.   उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक आम्ले, फुलंब्री  ठाण्याचे पोलिस निरीक्षक बापूसाहेब महाजन, उपनिरीक्षक विजय जाधव फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले.

बातम्या आणखी आहेत...