आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेंद्र्यात पंधरा एकरवर बंगले, फ्लॅट उभारणार; 11 एप्रिलपर्यंत करता येईल ऑनलाइन प्लॉट बुकिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शेंद्रा डीएमआयसीतील पायाभूत सुविधांचे काम डिसेंबर २०१८ मध्ये संपत आहे. आता तेथे १५ एकर जागेवर गृहसंकुलांचे काम सुरू होत असून प्लाॅटचा दर ९०० रुपये चौमी आहे. प्लॉट बुक करण्याची शेवटची तारीख ११ एप्रिल असून फ्लॅटसाठी विकासकांना जागा दिली जाणार असून त्याचे दरही तेच ठरवतील. 


शेंद्रा डीएमआयसीतील (ऑरिक सिटी) पायाभूत सुविधांची कामे ७० टक्के झाली आहेत. चालू वर्षाच्या डिसेंबरअखेरीस ही कामे शंभर टक्के पूर्ण करण्याचे लक्ष शासनाने शापूरजी पालनजी कंपनीला दिले आहे. येथे कोरियाची ह्युसंग कंपनी आली असून बांधकामाची तयारी सुरू केल्याने या ठिकाणी गृह प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली आहे. खासगी बंगल्यासाठी येथे प्रत्येकी ९६० चौ. मी. जागा उपलब्ध असून ऑरिक सिटी डॉट कॉम या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज उपलब्ध आहेत. अफोर्डेबल हाउसिंग योजनेत येथे फ्लॅटचीही योजना सुरू होत आहे. त्यासाठी जागा खासगी विकासकांना देण्यात येणार आहे. फ्लॅटचा आकार ६०० चौरस फूट असून मे महिन्यात त्याच्या निविदा निघतील. तसेच या ठिकाणी जमीन सपाटीकरणाची कामे होणार आहेत. त्याचे टेंडर १३ एप्रिल रोजी निघणार आहे. 

 

कुणीही घेऊ शकतो फ्लॅट अन् प्लॉट 
डीएमआयसी शेंद्र्यात बंगला बांधण्यासाठी प्लॉट व फ्लॅट कोणालाही घेता येईल. ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. आॅरिक सिटीच्या वेबसाइटवर याची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. 
- गजानन पाटील, सरव्यवस्थापक, ऑरिक 

बातम्या आणखी आहेत...