आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटीतील ऑक्सिजन सिलिंडर पाण्यात; ऑक्सिजन स्टोअरच्या छताला भगदाड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- ऑक्सिजन स्टोअरच्या छताला भगदाड पडल्यामुळे शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील ऑक्सिजन आणि नायट्रोजन सिलिंडर्स पाण्याखाली गेली आहेत. रुग्णालयाच्या तळमजल्यावरील ऑक्सिजन स्टोअरमध्ये पाणी शिरले आहे. या ठिकाणी जवळपास १०० सिलिंडर पाण्यात पडून आहेत. दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे स्टोअरमध्ये पाणी साचले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी या विषयी कळवूनही प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही.


ऑक्सिजनची सिलिंडरची जवळपास प्रत्येक वॉर्डात आवश्यकता असते. तर शस्त्रक्रियांसाठी नायट्रोजनची आवश्यकता असते. पाण्यामुळे गंज चढून सिलिंडर फुटण्याचीही भीती आहे. याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांनी सांगितले की, स्टोअर रूम बरीच जुनी आहे. या ठिकाणी सिलिंडरचा साठा असतो. या रूमवरील पत्रांवर रुग्णांच्या नातलगांनी कचरा आणि खरकटे अन्न टाकल्याने पत्रे गंजले आ

बातम्या आणखी आहेत...