आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादचा कचरा प्रश्न सोडवण्यासाठी पंचसूत्री योजना, मुख्‍यमंत्र्यांची माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - औरंगाबादच्या कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी विशेष पंचसूत्री योजना तयार केली असून येत्या काळात हा प्रश्न पूर्णत: सोडवला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक निधीही सरकारने उपलब्ध केले आहे.

 

आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईबाबतची वस्तुस्थिती जाणून घेऊन त्याबाबतचे सविस्तर निवेदन राज्य सरकारतर्फे करण्याची हमीही त्यांनी या वेळी दिली.  
या वेळी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद महापालिका बरखास्त करून प्रशासक नेमण्याची तसेच पोलिस आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी याप्रकरणी संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची एक बैठक घेऊन विशेष पंचसूत्री योजना तयार केली आहे. याशिवाय पोलिस कारवाईबाबतची वस्तुस्थिती जाणून घेऊन त्याबाबतचे सविस्तर निवेदन केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिले.  


पोलिस आयुक्तांची बदली करा : शिरसाट  
मिटमिटा परिसरात झालेल्या घटनेनंतर सर्वसामान्य लोकांवर अन्याय्य पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याला जबाबदार असलेल्या पोलिस आयुक्तांची बदली करण्याची मागणी औचित्याच्या मुद्द्याद्वारे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...