आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

44.1 अंशांसह परभणी देशात सर्वाधिक उष्ण; मराठवाडा-विदर्भ तापला, पारा चाळिशीपार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - विदर्भ अाणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत पारा ४० अंशांवर राहिला. परभणीत सर्वाधिक ४४.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. हवामान खात्यानुसार परभणी देशात सर्वात उष्ण ठिकाण राहिले. विदर्भात २६ ते २८ एप्रिल या काळात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहील, असा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे.   


पुणे वेधशाळेने नोंदवलेल्या निरीक्षणानुसार मराठवाडा, विदर्भासह उत्तर महाराष्ट्रातील कमाल तापमानात मागील आठवड्यापासून लक्षणीय वाढ झाली आहे. आगामी काळात मध्य  महाराष्ट्रासह राज्यातील तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ होण्याची शक्यता आहे. बुधवारी मराठवाडा, विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत पारा ४० अंशांवर राहिला. परभणीत देशातील सर्वाधिक ४४.१ अंश तापमानाची नोंद झाली.

 

राज्यातील तापमान
परभणी ४४.१ , नांदेड ४३, औरंगाबाद ४०, उस्मानाबाद ४१, बीड ४२, अकोला ४३.३, चंद्रपूर ४३.९, यवतमाळ ४२.५, अमरावती ४१.६, बुलडाणा ४०.६, नगर ४१.८, सोलापूर ४२.१, जळगाव ४२.९ आणि नाशिक ३९.१

बातम्या आणखी आहेत...