आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादमध्‍ये हेलिकॉप्‍टरमधून बीयांचे रोपण, देशातील पहिलाच प्रयोग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील दौलताबाद किल्‍ला परिसरातील एका डोंगरावर हेलिकॉप्‍टरद्वारे बियांची फवारणी करण्‍यात आली. आज गुरूवारी औरंगाबादचे विभागीय आयुक्‍त पुरूषोत्‍तम भापकर यांच्‍या हस्‍ते हेलिकॉप्‍टरमधून या परिसरात बीया टाकण्‍यात आल्‍या. वाल्मिकी संस्‍थेच्‍या वतीने हा प्रयोग राबविण्‍यात आला. देशात वृक्ष लागवडीसाठी प्रथमच असा प्रयोग करण्‍यात आल्‍याची माहिती वाल्मिकी संस्‍थेतर्फे देण्‍यात आली आहे.


दौलताबाद किल्‍ला परिसरातील एक डोंगर वाल्मिीकी संस्‍थेतर्फे दत्‍तक घेण्‍यात आला आहे. या डोंगरावर 1 लाख बीया पेरण्‍याचा उपक्रम आज औरंगाबादमध्‍ये राबवण्‍यात आला. मात्र या ठिकाणी माणसाचे जाणे अवघड असल्‍याने हेलिकॉप्‍टरद्वारे हा उपक्रम राबविण्‍याचे वाल्मिकीतर्फे ठरवण्‍यात आले होते. अखेर आज पुरूषोत्‍तम भापकर यांच्‍या हस्‍ते हेलिकॉप्‍टरमधून बीया पेरण्‍यात आल्‍या.


या पद्धतीबद्दल वाल्मिकीतील एका अधिका-याने सांगितले की, अशा प्रकारचे प्रयोग आखाती देशात नेहमी केले जातात. त्‍याचे अपेक्षित असे परिणामही मिळतात. मात्र देशात पहिल्‍यांदाच हा प्रयोग राबविला जात आहे. तर विभागीय आयुक्‍त पुरूषोत्‍तम भापकर म्‍हणाले की, 'या परिसरात नैसर्गिकरित्‍या वाढ होतील अशाच सीताफळ, चिंच, कडुलिंब या वृक्षांच्‍या बीया टाकण्‍यात आल्‍या आहेत. त्‍यांच्‍या संवर्धनासाठीही प्रयत्‍न केले जातील.'