आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयटी, 'दिव्य मराठी'च्या वतीने पॉलिटेक्निक प्रवेश मार्गदर्शन शिबिर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलॉजी (एमआयटी) तसेच दैनिक "दिव्य मराठी'च्या वतीने शनिवारी (दि. ७ जुलै) दुपारी ४ वाजता "मिशन पॉलिटेक्निक'अंतर्गत फॉर्म भरण्याबाबत एमआयटीच्या सभागृहात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना असलेल्या शंका तसेच प्रश्नांची उत्तरे या शिबिरादरम्यान देण्यात येणार आहेत. 


२२ जुलैपासून अॉप्शन फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहे. दरम्यान, या शिबिरामध्ये दहावी तसेच १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय तसेच अभ्यासक्रमाची निवड, कट ऑफ लिस्ट, पॉलिटेक्निकच्या सुधारित प्रवेश प्रक्रियेत नोंदणी, फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यावी, कोणता अभ्यासक्रम चांगला, ऑप्शन फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यावी, यावर मार्गदर्शन केले जाईल. केंद्र सरकार तसेच राज्य सरकार विविध उपक्रम राबवत असतात. दरम्यान, अर्ज निश्चिती प्रक्रिया सुरू आहे. प्रत्यक्ष फेरीलादेखील सुरुवात करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया कशी, कोणती काळजी घ्यावी, कोणता अभ्यासक्रम चांगला, टीएफडब्ल्यूएस योजनेसह विविध प्रश्नांबाबत तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. महेश शिवणकर, प्रवेश प्रक्रियेचे समन्वयक डॉ. गोविंद संगवई हे मार्गदर्शन करणार आहेत. या मार्गदर्शन शिबिराचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन एमआयटी तसेच "दिव्य मराठी'तर्फे करण्यात आले आहे.   

बातम्या आणखी आहेत...