आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विदर्भात पुन्हा उष्णतेची लाट येण्याची शक्यता; राज्यात सर्वाधिक तापमान 45.6 अंश चंद्रपूरमध्ये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे/नागपूर- मे महिना उजाडण्याआधीच विदर्भात उष्णतेची जोरदार लाट आली असून बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ४२ ते ४४ अंशांच्या पुढे गेले. विदर्भातील चंद्रपूर येथे तर पाऱ्याने ४५ अंशांचा आकडा ओलांडला. चंद्रपुरात ४५.६ अंश सेल्सियस इतक्या राज्यातल्या सर्वाधिक तापमानाची नोंद शुक्रवारी झाली. पुढच्या दोन दिवसांत विदर्भ-मराठवाड्यातील तापमान चढे राहणार असून विदर्भात एक-दोन ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. विदर्भाप्रमाणेच मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये, खान्देशात तसेच पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर, सांगली, साताऱ्याच्या बहुतांश भागात पाऱ्याने चाळीशी गाठली. 


थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वरच्या डोंगरातही ३४.६ अंश तापमानाची नोंद झाली. गेल्या चोवीस तासांतील किमान तापमान पुणे येथे १७.६ अंश सेल्सियस इतके नोंदले गेले. रात्र आणि दिवसाच्या तापमानात अनेक ठिकाणी सरासरी २० अंशांचा फरक पडल्याचे चित्र राज्यात आहे. राज्यात सर्वत्र कोरडे हवामान असून सरासरी कमाल तापमानात अंशतः वाढ झाली आहे. बुलढाण्याचा अपवाद वगळता इतर शहरांचा पारा ४४ अंशाच्या वर होता. अकोला येथे ४४.२ अंश सेल्सियस, ब्रम्हपुरी ४४.३, नागपूर ४४.१ व वर्धा येथे ४४.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. अमरावती ४२.६, गडचिरोली ४३.४, गोंदिया ४२.२, वाशिम ४२, यवतमाळ येथे ४३.५ तर बुलढाणा येथे ४१.५ अंश सेल्सियस तापमान होते. 


चोवीस तासांतील प्रमुख शहरांचे कमाल तापमान 
मुंबई ३२.४ 
पुणे ३८.६ 
रत्नागिरी ३३.० 
कोल्हापूर ३७.९ 
सातारा ३९.१ 
सोलापूर ४१.४ 
नागपूर ४४.१ 
अकोला ४४.२ 
अमरावती ४२.६ 
जळगाव ४२.८ 
मालेगाव ४२.६ 
नाशिक ३७.६ 
पणजी (गोवा) ३४.२ 
(तापमान अंश सेल्सियसमध्ये)

बातम्या आणखी आहेत...