आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद दंगल प्रकरण : प्रदीप जैस्वाल यांना मिळाला जामीन, घाटीत ICU मध्ये सुरु होते उपचार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेनेचे माजी खासदार व महानगर प्रमुख प्रदीप जैस्वाल यांची गुरुवारी जामिनावर सुटका करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी छातीत दुखत असल्याने घाटीत हाॅस्पिटलमध्ये आयसीसीयुत दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर औरंगाबाद दंगल प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गोंधळ घातल्याचा आरोपात गुन्हा दाखल करण्यात     आला होता. 

 

क्रांती चौक पोलिसांनी हाणामारी, धमकी दिल्याप्रकरणी गांधीनगरातील विशाल रवी कागडा (१९), रोहित सुमेश डुलगज (१९) आणि सुमीत ऊर्फ शेरा प्रेम कागडा (२६) यांना गुरुवारी रात्री अटक केली होती. या तिघांमुळेच ११ मे रोजी गांधीनगरात वादाला सुरुवात झाली होती. रविवारी रात्री जैस्वाल क्रांती चौक पोलिस ठाण्यात गेले आणि विशाल कागडा आणि रोहित डुलगज या दोघांना लगेच जामिनावर सोडून द्या म्हणत त्यांनी ठाण्यात राडा सुरू केला. त्या वेळी पोलिस ठाण्यात जमादार चंद्रकांत निवृत्ती पोटे, तांदळे, महिला जमादार सिंधू गिरी, मंगला सोनवणे, आशा अडागळे, संगीता राजपूत आणि सहायक फौजदार संजय बनकर हजर होते.

जैस्वालांची मागणी ऐकून ठाण्यातील पोलिसांनी सहायक पोलिस निरीक्षक शेख अकमल यांना बोलावून घेतले. अकमल यांनी जैस्वालांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनाच पोलिस अटक करीत आहे. तुम्ही व तुमचे वरिष्ठ अधिकारी माझ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्रास देत आहात, असे म्हणत पोलिसांसमोर वरिष्ठ अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच या मुलांना सोडले नाही तर उद्या शहरात काय घडते ते बघा अशी धमकी दिली आणि जैस्वाल निघून गेले. थोड्या वेळाने पुन्हा पोलिस ठाण्यात येऊन त्यांनी ठाणे अंमलदार पोटे यांच्या टेबलवरील काच पेन स्टँडने फोडत खुर्च्या अस्ताव्यस्त फेकून दहशत निर्माण केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रभारी अधिकारी विजय घेरडे यांनी धाव घेतली. त्यांनी जैस्वाल यांना समजावून सांगितले. जैस्वालांसोबत सात ते आठ कार्यकर्ते होते. यानंतर चंद्रकांत पोटे यांच्या तक्रारीवरून जैस्वालांविरुद्ध सरकारी कामात अडथळा व सरकारी नोकरदारांना मारहाण केल्याप्रकरणी भादंविच्या कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६, ४२७, सहकलम ७ नुसार गुन्हा दाखल केला.जैस्वाल यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. व्ही. खारकर यांनी सुनावली. जैस्वालांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.

 

बातम्या आणखी आहेत...