आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडमध्ये बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या गर्भवती महिलेवर बलात्कार, पीडितेने पेटवून घेतले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- बाळंतपणासाठी साठी माहेरी आलेल्या महिलेवर गावातील एका नराधमाने बलात्कार केला. हा अत्याचार सहन न झाल्याने पीडितेने अंगावर राॅकेल ओतून जाळून घेतले. या दुर्देवी घटनेत ती गंभीररित्या भाजली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला कठोर शिक्षा करण्याची मागणी जनसामान्यांतून केली जात आहे. 

 

सिरस पारगाव येथील एका विवाहित महिला प्रसुतीसाठी माहेरी आली होती. आरोपी विष्णू तुकाराम नवले याने  रात्री अंधाराचा फायदा घेत घरात घुसून महिलेवर जबरदस्ती केली. 

या प्रकरणाने प्रचंड मानसिक तणावात असलेल्या महिलेने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले. यामध्ये महिला 76 टक्के भाजली असून तिला  जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 याप्रकरणी तहसीलदार व पोलिसांसमोर महिलेने जबाब दिला असून आरोपी विरोधात कलम 376 व अॅट्रासिटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आरोपी विष्णु नवले यास काल रात्री ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.  महिलेवर बलात्कार झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

बातम्या आणखी आहेत...