आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्थाचालकाच्या मुलाची मुख्याध्यापकास मारहाण, कपडे फाडून केली शिवीगाळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शाळेच्या कामकाजात हस्तक्षेप करत संस्थाचालकाच्या मुलाने मुख्याध्यापकाचे कपडे फाडून शिवीगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार २ मे रोजी सकाळी गारखेड्यातील जगदंबा प्राथमिक शाळेत घडला. याप्रकरणी मुख्याध्यापक मच्छिंद्र एकनाथ वर्पे यांच्या तक्रारीवरून संस्थाचालकाचा मुलगा प्रकाश जवळकर याच्याविरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


वर्पे बुधवारी सकाळी शाळेत काम करत होते. तेव्हा जवळकर याने कार्यालयात प्रवेश करत तुम्ही शालेय सुधार निधी जमा करत नाही, प्रत्येक शिक्षकाकडून दहा हजार रुपये पाहिजे, अशी मागणी करत शिवीगाळ सुरू केली. त्यांना शाळेच्या आवारात आणून कपडे फाडून मारहाण केली. दरम्यान, पोलिस हे प्रकरण गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...