आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात आज, उद्या पावसाचा इशारा; हवामान खात्याचा अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - राज्यात शुक्रवार-शनिवार मेघगर्जनेसह पावसाचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे, तर विदर्भात १८ ते १९ मे या काळात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 

 
पुणे वेधशाळेनुसार, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ दिसून आली. मराठवाडा व विदर्भात कमाल तापमानात किंचित वाढ झाली. शुक्रवारी (१८ मे) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. शनिवारी (१९ मे) मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 


दरम्यान, १८ ते १९ मे या काळात विदर्भात एक -दोन ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या हंगामातील पहिले चक्रीवादळ सागर अरबी समुद्रात तयार झाले असून ते एडनच्या आखाताकडे सरकले आहे. सागरी वादळाचा भारतीय किनारपट्टीला धोका नसल्याचे हवामानशास्त्र विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...