आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरे औरंगाबादेत, मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळाव्‍यात होणार सहभागी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पुण्याहून कारने शहरात आले. वाळूज येथील ओअॅसिस चौकात कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले, मात्र क्रांती चौकातील स्वागत न स्वीकारताच ते पुढे गेले. या बाबत मनसे नेत्यांना विचारले, असता क्रांती चौकात कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाल्यामुळे पोलिसांच्या पायलटिंगने पुलावरून गाडी घेतल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर ते थेट हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये मुक्कामासाठी गेले. गुरुवारी सकाळी सुभेदारीत पत्रकार परिषद आणि तापडिया नाट्य मंदिरात मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...