आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद शहराचे वाटोळे करणाऱ्या शिवसेनेला जाब विचारणार नाहीच का? : राज ठाकरे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पंचवीस वर्षांपासून सत्तेत असलेल्या शिवसेनेला औरंगाबादच्या कचऱ्याचा प्रश्न सोडवता आलेला नाही. त्यांनी औरंगाबादचे वाटोळे केले आहे. महानगरपालिका खाऊन खाऊन रिकामी करायची हेच त्यांचे काम आहे. शहराचे वाटोळे करणाऱ्या शिवसेनेला शहराची जनता काहीच विचारणार नाही का? वर्षानुवर्षे हेच लोक सत्ता उपभोगतात कसे, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केला. 


पक्षबांधणीसाठी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरेंना औरंगाबादच्या कचरा समस्येबाबत विचारले असता ते म्हणाले, आम्ही नाशिकला कचऱ्याचा प्रश्न कसा सोडवला आहे हे जाऊन पाहा. एकाच डंपिंग ग्राउंडमध्ये कचऱ्यापासून खत, इथेनॉल निर्मिती केली जाते. पहिल्या पाच वर्षांतच आम्ही कचऱ्याचा प्रश्न सोडवला. मात्र, गेल्या २५ वर्षांत औरंगाबादेतील सत्ताधाऱ्यांना तो सोडवता आलेला नाही. ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांनीच शहराचे वाटोळे केले. त्या शिवसेनेला जनता काहीच विचारणार नाही का ? एकेकाळी देशाचे प्रबोधन करणाऱ्या महाराष्ट्राचेच आता प्रबोधन करण्याची वेळ आली आहे, असे राज म्हणाले. 


खैरे वैचारिक नेतृत्व आहे का?
मनसेकडे जिल्हा पातळीवर वैचारिक नेतृत्व नाही. केवळ हुल्लडबाज अशी पक्षाची प्रतिमा आहे, असे विचारले असता, पूर्वी शिवसेनेलाही गुंड-मवाल्यांची संघटना संबोधले जायचे. वैचारिक नेतृत्व म्हणजे नेमके काय? चंद्रकांत खैरे हे काय वैचारिक नेतृत्व आहे? अनेक वर्षांपासून चालत आलेल्या वारशामुळे असे लोक निवडून येतात. पण एक वेळ बदलाची येतेच. तो बदल २०१९ मध्ये घडेल. तो घडणार म्हणूनच खैरेंनी आता मला लोकसभा लढवायची नाही, विधान परिषदेवर पाठवा आणि मंत्री करा, अशी चर्चा सुरू केली तर नाही ना? असे राज म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...