आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादेत पोलिस अधिकार्‍यावर संतापले पर्यावरणमंत्री, गुन्हा दाखल करण्याचे दिले आदेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-  शिवेसना प्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या औरंगाबाद दौ-यावर आहेत यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक नेते देखील दौ-यात असणार आहेत. पर्यावरणमंत्री रामदास कदम हे देखील ठाकरे यांच्यासोबत दौ-यावर आहेत. उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील पोलिसांची एक गाडी फारच धूर सोडत होती हे पाहून कदम यांना संताप आला त्यांनी लागलीच पोलिस अधिका-यांना बोलावून घेतले आणि भंगार गाड्या वापरुन प्रदूषण का परसवता असा जाब विचारला, शिवाय संबंधित वाहनावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. 


उद्धव ठाकरेंचे गुरुवारी सकाळी औरंगाबादमध्ये आगमन झाले. विमानतळापासून सुभेदारी विश्रामगृहात त्यांना पोलिस बंदोबस्तात आणण्यात आले. त्यावेळी कदम देखील त्यांच्या गाडीत होते. गाडीसमोर असलेली पोलिसांची एक गाडी प्रचंड धूर सोडत होती. पर्यावरण मंत्र्यासमोरच हा प्रकार घडल्याने रामदास कदम चांगलेच संतापले त्यांनी विश्रामृहावर पोहचताच जीपचा चालक, व त्यात बसलेले पोलिस कर्मचारी आणि वरिष्ठ अधिका-यांना बोलावून घेतले आणि चांगलेच झापले. इतकेच नाही तर प्रोटोकाॅल अधिका-यांना पर्यावरण कायद्यानुसार त्या वाहनावर कारवाई करण्याचे आदेश दिले. 
 

 

बातम्या आणखी आहेत...