आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 वर्षीय भाचीवर चुलत मामाकडूनच बलात्कार, पीडिता 7 महिन्यांची गर्भवती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - खेळण्या- बागडण्याचे दिवस होते तेव्हा वडिलांचे छत्र हरवले. दोन लहान बहिणी आणि एका भावाला सोडून आईही देवाघरी गेली. आत्याला कीव आली म्हणून तिने पदरात घेतले. मात्र, वासनांनी भरलेल्या जगात आपले म्हणवणाऱ्यांनीच तिच्या अब्रूचे लचके तोडले. एका ३२ वर्षांच्या आणि १५ वर्षांच्या चुलत मामाने तिच्यावर बलात्कार केला. पीडिता ७ महिन्यांची गर्भवती राहिली. त्यातून हा प्रकार समोर आला. या दोघांच्या विरोधात हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

पीडिता जाधववाडी परिसरातील आहे. कृष्णा प्रकाश पोपळघट (३२, रा. रेल्वे रुळांजवळ, जयभवानीनगर, मुकुंदवाडी) असे अत्याचारी मामाचे नाव आहे. तो मार्केटिंग करतो, तर दुसरा संशयित हा इयत्ता दहावीत शिक्षण घेत असून १५ वर्षांचा आहे. या मामाने पीडितेला गुंगीचे औषध देत तिच्यावर पहिला अत्याचार केला. त्यानंतर धमकी देत चार वेळा हा प्रकार केला. तिच्या आईच्या आत्याचा अल्पवयीन मुलगा आॅक्टोबर २०१७ मध्ये तिला घरी घेऊन गेला. तेथे त्याने पीडितेला थांबण्याचा आग्रह केला. तिने नकार दिल्यावर त्याने बळजबरी करत तिला घरात खेचले. तेथे तिच्यावर अत्याचार केला. पण पीडितेने घडलेला प्रकार आत्याला सांगण्याचे टाळले. नेहमी आजी-आजोबाला भेटण्यासाठी पीडिता मामा कृष्णा पोपळघट याच्यासोबत जायची.


या घटनेनंतर काही दिवसांनी कृष्णा पोपळघट रुग्णालयात आला. त्याने नेहमीप्रमाणे तिला आजी-आजोबाची भेट घालून देतो, असे म्हणत स्वत:च्या घरी नेले. त्याने पाण्यातून पीडितेला गुंगीचे औषध देत तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. नंतर शुद्धीवर आलेल्या पीडितेला पोपळघटने रुग्णालयात नेऊन सोडले. यानंतर त्याने चार वेळा तिच्यावर अत्याचार केला. त्यातून पीडितेला गर्भधारणा झाली. हा प्रकार आत्याच्या लक्षआत आल्यावर तिने पीडितेची वैद्यकीय तपासणी केली. तेव्हा डॉक्टरांनी ती सात महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. त्यामुळे तिच्यावर प्रश्नांचा भडिमार सुरू केला. त्या वेळी तिने घडलेला प्रकार नातेवाइकांना सांगितला. दरम्यान, मंगळवारी पीडितेसोबत तिच्या नातेवाइकांनी हर्सूल पोलिस ठाणे गाठले. पीडितेच्या तक्रारीवरून अल्पवयीन बालक व पोपळघट यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास महिला उपनिरीक्षक सरला गाडेकर करत आहेत. दरम्यान, बुधवारी रात्री पोलिसांनी कृष्णा पोपळघट व अल्पवयीन आरोपीला अटक केली.

 

वडिलांचे ८, आईचे ३ वर्षांपूर्वी निधन
पीडितेच्या वडिलांचे आठ वर्षांपूर्वी, तर आईचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. सध्या ती आत्याकडे राहायला आहे. आत्या मोलमजुरी करून कुटुंब चालवते. त्याच गल्लीत पीडितेच्या आईच्या आत्याचेही घर आहे.

 

बातम्या आणखी आहेत...