आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सतरा वर्षांच्या मुलाने केला तेरा वर्षांच्या मुलीवर बलात्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सतरा वर्षांच्या मुलाने तेरा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना जिन्सी परिसरात घडला आहे. या प्रकरणील संशयित आरोपीला जिन्सी पोलिसांनी अटक केली आहे. ६ जून रोजी ही घटना घडली होती. मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून या प्रकरणात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


बायजीपुरा भागातील एका शाळेत पाचवी वर्गात शिक्षण घेत असलेल्या बालिकेकडे १७ वर्षीय बालक दोन महिन्यांपासून शरीरसुखाची मागणी करत होता. मात्र, त्याला बालिका नकार देत होती. शेवटी ६ जून रोजी त्याने पीडितेला बळजबरी रिक्षात बसवून नेले. यानंतर अल्तमश कॉलनी परिसरातील मोकळ्या मैदानात तिच्यावर अत्याचार केला. यानंतर तिला शंभर रुपये देत कोणाला घडलेला प्रकार सांगितल्यास जिवे मारीन, अशी धमकी देत तो पसार झाला. 


या घटनेनंतर दोन दिवसांनी (८ जून) पीडिता घरात दिसली नाही. म्हणून संतापलेल्या आईने तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर पीडिता पाय घसरत चालू लागल्याने तिच्या आईला संशय आला. त्यामुळे तिला आईला घाटीत उपचारासाठी दाखल केले. तेव्हा तिच्यावर अत्याचार झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पण अत्याचार केलेल्या बालकाचे नाव तिला माहिती नसल्याने पोलिसांना तपासात अडथळा निर्माण झाला. दोन-तीन दिवसांपासून पोलिस घरी येत असल्याचे पाहून पीडितेच्या दहावर्षीय भावाने सहायक पोलिस निरीक्षक शरद जोगदंड यांना विचारले. त्याच वेळी पोलिसांनी पीडितेला कोणी त्रास देत होते का? अशी विचारणा केल्यावर तिच्या भावाने संशयित आरोपीचे घर दाखवले. 

बातम्या आणखी आहेत...