आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैत्री करून तरूणीवर 3 वर्षे अत्‍याचार, अश्लिल फोटो व्‍हायरल करण्‍याची दिली धमकी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - चार वर्षांपूर्वी महापालिका निवडणूकीच्‍या प्रचारादरम्‍यान झालेल्‍या ओळखीवरून तरूणाने तरूणीशी मैत्री केली. व नंतर एकतर्फी प्रेमातून तिच्‍या छायाचित्रांचा गैरवापर करत, ते व्‍हायरल करण्‍याची धमकी देत तिच्‍यावर तब्‍बल 3 वर्षे बलात्‍कार केल्‍याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन आरेफ युनूस पटेल (26, रा. जटवाडा) याच्या विरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

अशी केली मैत्री

सध्या पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या पिडित तरुणी 2014 मध्ये एपीआय कॉर्नर येथील कार्यालयात नोकरी करत होती. त्यामुळे कंपनीमार्फत त्या वेळी पार पडलेल्या मनपा निवडणुकीच्या कामानिमित्त तिचे बाहेर येणे जाणे होते. याच निवडणूकीच्या प्रचारादरम्यान एन-४ भागात तिची आरेफ सोबत ओळख झाली होती. ओळख झाल्याच्या पाच महिन्यानंतर आरेफने अचानक तिला मोबाईलवर संपर्क साधत नोकरीचे आमिष दाखवले. या कारणाचा आधार घेत त्याने तिच्यासोबत व्हॉट्सअॅपवर बोलणे वाढवून प्रेमाचा हट्ट धरला.

 

नंतर केला अत्‍याचार

नोव्हेंबर 2015 मध्ये तरुणी परिसरातून पायी जात असताना त्याने तिला रस्त्यात अडवून दुचाकीवर बसून बाहेर जाण्यासाठी दबाव टाकला. तेथून त्याने तिला आरेफ कॉलनीतील मित्राच्या घरी नेले. तेथे नेल्यावर बळजबरीने तिच्यावर अत्याचार करत त्याचे मोबाईलमध्ये छायाचित्र काढले. हे छायाचित्र व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी देत त्याने तीन वर्षांपासून वारंवार अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. मागील काही दिवसांमध्ये त्याचा छळ व अत्याचार वाढत असताना अखेर तरुणीने हा प्रकार आईला सांगितला. मैत्रीणी व आईने धीर दिल्यावर त्यांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात जाऊन आरेफविरोधात तक्रार दिली. त्यावरुन आरेफविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक शिंदे पुढिल तपास करत आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...