Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Reason Behind anger of Maratha community on CM Fadanvis

मुख्यमंत्र्यांची भूमिका प्रामाणिक नसल्यानेच त्यांच्यावर मराठा समाजाचा राग-विनोद पाटील

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 25, 2018, 12:09 PM IST

आरक्षणाबाबत त्यांची भूमिका प्रामाणिक असल्याचे दिसले नाही. म्हणून मराठा समाजाचा मुख्यमंत्र्यांवर, सरकारवर राग आहे.

 • Reason Behind anger of Maratha community on CM Fadanvis

  औरंगाबाद- मराठा समाज आरक्षण प्रकरण कोर्टात गेल्यानंतर चालढकल एवढेच मुख्यमंत्र्यांचे धोरण राहिले. आरक्षणाबाबत त्यांची भूमिका प्रामाणिक असल्याचे दिसले नाही. म्हणून मराठा समाजाचा मुख्यमंत्र्यांवर, सरकारवर राग आहे, असे मराठा आरक्षणाविषयी याचिका दाखल करणारे विनोद पाटील यांनी सांगितले.

  1. आरक्षण :

  2014 ते 30 सप्टेंबर 2016 पर्यंत सरकारने आरक्षणावर हालचाल केली नाही. कोर्टाच्या आदेशावरूनच मागासवर्ग आयोग स्थापन केला. अध्यक्षांचे निधन झाल्यावर तातडीने नव्या अध्यक्षांची नियुक्ती केली नाही. मराठा समाजाविषयीचा सरकारकडील डाटाही स्वत: पुढाकार घेत उपलब्ध करून दिला नाही. ते आम्हीच कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. मग कोर्टाच्या आदेशावरूनच तो देण्यात आला.

  2. आर्थिक मागासांना सवलत :
  आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठी सरकारने गतवर्षी शैक्षणिक शुल्कात सवलत देत आदेश काढला. तो सर्व शिक्षण संस्थांपर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळे काही संस्थाचालक संभ्रमात आहेत. चालढकल करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कुलगुरू, संस्थाचालकांची एक स्वतंत्र बैठक घेऊन त्यांना आदेशाचे पालन तत्काळ झालेच पाहिजे, असे खडसावून सांगितले पाहिजे. ज्या संस्था सवलत देत नाहीत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.

  3. मेगा भरती :
  मेगा भरतीला स्थगिती का हवी, या प्रश्नावर पाटील म्हणाले की, एवढी मोठी भरती पुन्हा होणार नाही. एकदा संधी गेली की ती परत येणार नाही. त्यामुळे 16 टक्के आरक्षण मिळाल्यावरच भरती झाली पाहिजे, अशी मराठा समाजातील तरुणांची मागणी आहे.

  4. कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा :
  आता सरकारने मराठा आरक्षणाची सोडवणूक कशी करणार, हे सांगणारा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला पाहिजे. म्हणजे मागासवर्ग आयोगाचा अहवाल कधी येणार, तो कोर्टात कधी सादर करणार, मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर कधी चर्चा होणार, याचा तारखा दिल्या तरच काही प्रमाणात सरकार काहीतरी करत आहे, असे चित्र निर्माण होईल, असेही पाटील म्हणाले.

Trending