आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा 40 वर्षांपासून कर्जबाजारी; आजही 138 कोटींची देणी बाकी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- भूमिगत गटार योजनेमुळे मनपाच्या कर्जबाजारीपणाची चर्चा होत असली तरी प्रत्यक्षात नगर परिषद असल्यापासून म्हणजे १९७७ पासून या संस्थेवर कायम कर्ज राहिले आहे. आजही १३८ कोटींचे कर्ज असल्याची अधिकृत माहिती बुधवारी सर्वसाधारण सभेत मुख्य लेखाधिकारी रामप्रसाद साळुंके यांनी दिली. 


१९७७ मध्ये तत्कालीन नगर परिषदेने कर्ज घेतले होते. त्यानंतर १९९० ला दुसरे कर्ज घेण्यात आले. १९९० चे कर्ज अजून फेडले नसल्याचेही त्या निमित्ताने समोर आले. मनपाच्या तिजोरीत गतवर्षी ५९० कोटी जमा झाले, त्यातील ५६५ कोटी रुपये बांधील खर्च आहे. त्यात कर्मचाऱ्यांचे वेतन, कर्जाचे हप्ते, पाणीपुरवठा योजनेचे बिल यासह इतर कामांचा समावेश आहे. सध्या ३३ कोटींची ठेकेदारांची देयके रखडलेली आहेत. पथदिव्यांचे १७ कोटी रुपये देणे आहे. 


विवरणपत्राचा विसर
महाराष्ट्र प्रांतिक महापालिका अधिनियमानुसार दरवर्षी आयुक्तांनी विवरणपत्र सादर करायचे असते. म्हणजे कर्जाचे हप्ते कसे फेडायचे, त्याचे नियोजन कसे करायचे, याचा तो लेखाजोखा असते. परंतु आतापर्यंत असे विवरणपत्र कधीच देण्यात आले नसल्याचे राजेंद्र जंजाळ यांनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर समोर आले. 

बातम्या आणखी आहेत...