आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसऱ्या दिवशीही निवासी डॉक्टरांचे काम बंद, रुग्णाच्या नातेवाइकांनी मारहाण केल्याचा आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- रुग्णाच्या नातेवाइकांनी मारहाण केल्याचा आरोप करत शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील ३१२ निवासी डॉक्टरांनी बुधवारी मध्यरात्रीपासून काम बंद आंदोलन केले. शुक्रवारी सायंकाळपर्यंत हे आंदोलन सुरूच होते. रात्री उशिरापर्यंत अधिष्ठाता कार्यालयात बैठकांचे सत्र सुरू होते. मात्र तोडगा निघाला नाही. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी निवासी डॉक्टरांना कामावर रुजू होण्याची विनंती केली. तसेच स्थानिक पातळीवरील समस्या आठ दिवसांत मार्गी लावू, असे आश्वासन दिले. बैठकीस अधीक्षक डॉ. भारत सोनवणे, उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे उपस्थित होते. डॉ. सुक्रे म्हणाले की, नियमानुसार विभागप्रमुखांच्या परवानगीशिवाय दोन दिवसांहून अधिक काळ काम बंद करता येत नाही. सर्व निवासी डॉक्टरांनी उद्यापर्यंत कामावर रुजू व्हावे, असा सल्ला त्यांनी दिला. 


आज सकाळी होणार ऑडिट
शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेचे ऑडिट शनिवारी सकाळी १० वाजता होणार आहे. शहर पोलिस संपूर्ण रुग्णालयाची पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेच्या यंत्रणेसंबंधी मार्गदर्शन करतील. 


अत्यावश्यक शस्त्रक्रिया केल्या
निवासी डॉक्टरांच्या काम बंदचा कुठलाही परिणाम रुग्णांवर झाला नाही. सर्व अत्यावश्यक शस्त्रक्रिया शुक्रवारी करण्यात आल्या. मात्र, नियोजित शस्त्रक्रिया पुढील आठवड्यात करण्यात येतील. 

बातम्या आणखी आहेत...