आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारखेड्यात तीन चोरट्यांचा धुडगूस; दोन दुकाने फोडली; महिलेच्या सतर्कतेमुळे चोर गजाआड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मागील आठ दिवसांपासून गारखेडा परिसरात दुकानफोडीचे सत्र सुरू आहे. सोमवारी मध्यरात्री तीन चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. दोन दुकाने फोडण्यात ते यशस्वी झाले, तर पाच ठिकाणी दुकान फोडण्याचा प्रयत्न केला. दोन दुकानांमधून ४७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चाेरून नेला. एक दुचाकीही चोरी झाल्याचे समोर आले आहे. एक लॉटरीचे दुकान फोडताना तिन्ही चोरटे सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहेत. दरम्यान, एन-४ येथे घराच्या बाजूला कोणी तरी दरवाजा तोडत असल्याची जाणीव होताच एका महिला वकिलाने पोलिसांना माहिती दिल्यामुळे सराईत घरफोड्याला पोलिसांनी अटक केली. 


गारखेड्यातील गजानन कॉलनीत शिवसेना विभागप्रमुख राजू कल्याण चव्हाण (३५) यांचे राजू ऑनलाइन मल्टी सर्व्हिसेस नावाचे लॉटरी दुकान आहे. सोमवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास एका कारच्या आडोशाला बसलेल्या चोराचे दोन साथीदार तेथे आले. तिघांनी दुकानाचे शटर उचकटले. एक जण चव्हाण यांच्या दुकानात शिरला. त्याने गल्ल्यातील चिल्लर पैसे खिशात घातले. दोन हजार आणि पाचशेच्या उर्वरित.पान 


सलग अाठवा दिवस 
मागीलआठ दिवसांपासून गारखेडा आणि जवाहर कॉलनी परिसरात दुकानफोडीच्या घटना घडत आहेत. चोरट्यांना पकडण्यासाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक प्रयत्न करत आहे. दुकान फोडणारे अल्पवयीन आहेत. अनेक दुकानांत सीसीटीव्ही असल्याचे त्यांना माहीत आहे. आतापर्यंतच्या घटनांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याद्वारे चोरट्यांचा तपास सुरू आहे. 

बातम्या आणखी आहेत...