आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4,400 किमी प्रवास 22 दिवसांत! परभणीच्‍या सचिनची कन्याकुमारी ते काश्मीर सायकलवारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - सुप्पा (ता.गंगाखेड) येथील रहिवासी असलेल्या सचिन घोगरे या युवकाने कन्याकुमारी ते काश्मीर हा ४ हजार ४०० किमीचा प्रवास सायकलवरून केवळ २२ दिवसांत पूर्ण करण्याची मोहीम फत्ते केली. दररोज सरासरी २०० किलोमीटर अंतर सचिनसह पुणे येथील बिपिन उंद्रे या दोघांनी पार केले.

 

कन्याकुमारी ते काश्मीर अशी यात्रा पूर्ण करणारा सचिन घोगरे बुधवारी (दि.२१) पुण्याहुन त्याच्या गावी जाण्यासाठी देखील सायकलवरूनच शहरात आला असता पेस सायकलिंग ग्रुपच्या वतीने त्याचे स्वागत करण्यात आले. प्रवासातील अनुभव कथनाचा कार्यक्रम चांगलाच रंगला. पेस सायकलिंग ग्रुपचे डॉ.पवन चांडक, डॉ.राजगोपाल कालानी, संजय बनसकर, अॅड.उबाळे, सत्यनारायण चांडक, डॉ.आशा चांडक यांनी सचिनचा सत्कार केला. या दोघांनी पर्यावरण जनजागृतीसाठी १८ फेब्रुवारी रोजी विवेकानंद स्मारकाचे दर्शन घेऊन कन्याकुमारीतून सायकल प्रवासास सुरुवात केली होती.

 

जीपीएसअभावी लिम्का नोंद हुकली
तब्बल ४ हजार ४०० किमीचा प्रवास या दोघा युवकांनी केवळ २२ दिवसांत पूर्ण करून प्रतिदिन २०० किमीचे अंतर कापून एक नवा इतिहास सायकलस्वारीत रचला. परंतु तांत्रिक जीपीएस डीव्हाईसची कमतरता असल्याने लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्यांची नोंद होऊ शकली नाही.