आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन वाघ आत्महत्या प्रकरण: गुन्हे मागे घेण्यासाठी प्राध्यापक आज पोलिस आयुक्तांकडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आैरंगाबाद - एमआयटी नर्सिंग महाविद्यालयात कॉपी करताना पकडला गेलेला विद्यार्थी सचिन वाघ आत्महत्याप्रकरणी महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्व प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षक संघटना एकवटल्या असून कॉपी करताना पकडल्यानंतर विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणात प्राध्यापकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर शहरातील सर्व अभियांत्रिकी, नर्सिंग महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक एकवटले आहेत. संघटनांच्या दबावाखाली दाखल झालेले हे गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी शुक्रवारी ते पोलिस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन देणार आहेत.

 

सचिनच्या मित्रांचे जबाब नोंदवले
या प्रकरणाच्या तपासासाठी सातारा पोलिसांचे एक स्वतंत्र पथकच स्थापण्यात आले आहे. गुरुवारी दिवसभर सचिनच्या मित्रांचे जाबजबाब नोंदवण्यात आले. तसेच महाविद्यालयातून कागदपत्रेही जमा केली असून त्यांची तपासणी सुरू असल्याचे निरीक्षक भारत काकडे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...