आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत एकनाथांच्या पालखीचा मिडसांगवीत रंगला पहिला रिंगण सोहळा...डोळ्याचे पारणे फिटले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण- विठ्ठल माझी माय । आम्हा सुखा उणे काय। घेतो अमृताची धनी । प्रेम वोसंडले स्तनी। या अभंगाप्रमाणे आज संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवीत रंगला. 


पालखी प्रमुख रघुनाथबुवा यांच्या हस्ते नाथ महाराजांच्या पादुकांचे पूजन करून सुरू झाला. सकाळपासूनच मिडसांगवी गावात नाथभक्त, वारकऱ्यांची मोठी गर्दी रिंगण सोहळा पाहण्यासाठी केली होती. रिंगण सोहळ्यादरम्यान हलक्या सरीही कोसळल्याने भक्तिभावात वारकरी चिंब झाले. बालवारकरीही सहभागी झाले होते. 

बातम्या आणखी आहेत...